डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म होत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
१. साधिकेला तिच्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म होत असतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून शस्त्रकर्म करत आहेत’, असे जाणवणे
‘नोव्हेंबर २०१० च्या दुसर्या आठवड्यात माझ्या उजव्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म संभाजीनगर येथील प्रख्यात नेत्ररोगतज्ञ आधुनिक वैद्य संतोष अग्रवाल यांच्याकडे करण्याचे ठरले. ते हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक असल्याने माझा त्यांच्याशी परिचय होता. शस्त्रकर्माच्या वेळी मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आधुनिक वैद्य अग्रवाल यांच्या माध्यमातून शस्त्रकर्म करत आहेत’, असे जाणवत होते.
२. साधिकेचे शस्त्रकर्म झाल्यावर तिच्या डोळ्यात दुसरे कृत्रिम भिंग बसवण्यापूर्वी साधिकेला निळा रंग दिसणे आणि आधुनिक वैद्यांनी साधिकेला ‘तुमची साधना असल्याने तुम्हाला असे दिसत आहे’, असे सांगणे
माझ्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाल्यावर दुसरे कृत्रिम भिंग बसवण्यापूर्वी ५ मिनिटे मला निळा रंग दिसत होता. तेव्हा मी आधुनिक वैद्यांना सांगितले, ‘‘डॉक्टर, मला सर्व निळे दिसत आहे. सर्वांना असेच दिसते का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘काकू, तुम्ही नेहमी साधनेच्या आणि सनातन संस्थेच्या विचारांत रहाता ना. तुमची साधना आहे; म्हणून तुम्हाला असे दिसत आहे.’’
३. आधुनिक वैद्य संतोष अग्रवाल यांनी सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती शस्त्रकर्म कक्षात ठेवणे
सनातन-निर्मित सात्त्विक गणपतीची मूर्ती उपलब्ध झाल्यावर वर्ष २०१० मध्ये मी त्या आधुनिक वैद्यांना मूर्ती घेण्याची विनंती केली. त्यांनी रुग्णालयात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मी मागील वर्षी त्यांच्याकडे डोळ्यांची तपासणी करायला गेले होते. तेव्हा मला तेथील उपनेत्र (चष्मे) विक्रेत्याने सांगितले, ‘‘तुम्ही दिलेली गणपतीची मूर्ती डॉक्टरांनी शस्त्रकर्म कक्षात ठेवली आहे.’’
हे गुरुदेवा, आपल्याच अपार कृपेमुळे मला या अनुभूती आल्या. हे गुरुमाऊली, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७६ वर्षे), फोंडा, गोवा. (७.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |