वर्तमान स्थितीत भगवंताचे तत्त्व ज्या देवतेच्या रूपात समोर येईल, त्या रूपाला प्रार्थना करून त्या रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता आल्यास सर्वव्यापी भगवंताशी एकरूप होता येणे
‘वर्तमान स्थितीत समोर येईल, त्या देवाच्या तत्त्वांशी एकरूप होता आले पाहिजे. त्या वेळी समोर दिसणार्या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते आणि मग सर्वव्यापी असणार्या भगवंताशी एकरूप होता येते. काही जणांमध्ये सांप्रदायिकतेमुळे देवाच्या एकाच तत्त्वाविषयी भाव असतो, उदा. काहींना श्रीराम जवळचा वाटतो; परंतु हनुमंत नाही. जेव्हा हनुमंत समोर असेल, तेव्हा लगेचच त्याला प्रार्थना करून त्या तत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे कुठल्याही देवतेच्या एकाच तत्त्वात अडकायला होत नाही. ‘सर्वच देव जवळचे वाटायला लागल्यावर ‘देवप्राप्ती दूर नाही’, असे समजावे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ