पुणे जिल्ह्यातील धरणांत केवळ ४० टक्के पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४.८८ टी.एम्.सी. अल्प पाणीसाठा !
पुणे – पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत मिळून २३ फेब्रुवारीपर्यंत केवळ ७९.५२ टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ४०.०९ टक्के इतके आहे. हा उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या आजच्या दिनांकाच्या तुलनेत ५४.८८ टी.एम्.सी.ने अल्प आहे.
गेल्या वर्षीच्या आजच्या दिनांकाला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १३४.४० टी.एम्.सी. एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ६७.७६ टक्के एवढे होते. त्यामुळे यंदाचा आज अखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २७.६७ टक्क्यांनी अल्प झाला आहे. या २६ धरणांच्या व्यतिरिक्त टाटा समूहाच्या ६ धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी ६ धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टी.एम्.सी. एवढी आहे.