संदेशखाली येथे गावकर्यांनी तृणमूल काँग्रेसचा नेता अजित मैती याला चोपले !
हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुख्य सूत्रधार शहाजहान शेख याच्याशी संगनमत असल्याचा आरोप !
कोलकाता – बंगाल राज्यातील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात असलेल्या संदेशखाली येथे २३ फेब्रुवारी या दिवशी गावकर्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते अजित मैती यांच्यावर आक्रमण केले. या वेळी मैती यांना चांगलाच चोप देण्यात आला. त्यांना अक्षरश: चपलेने मारहाण करण्यात आली, तसेच संतप्त गावकर्यांनी त्यांच्या घराचीही तोडफोड केली. यासह लोकांनी त्यांची दुचाकी आणि घराच्या कुंपणाचा काही भागही तोडला. मैती यांनी गावातील भूमी बळकावल्याचा, तसेच हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुख्य सूत्रधार तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्याशी संगनमत केल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकर्यांना शांत केले.
सौजन्य द एकॉनॉमिक टाइम्स
शहाजहान शेख याच्यावर भूमी बळकावणे, तसेच महिलांच्या लैंगिक शोषण आदी कृत्यांचे तब्बल १०० गुन्हे नोंद आहेत. शेख गेल्या ५५ दिवसांपासून फरार आहे.
शेख शहाजहान याच्या भावाच्या घराला लावण्याती आली आग !
या वेळी गावकर्यांनी शहाजहान शेख याच्या भावाच्या घरालाही आग लावली. शेख शहाजहान याचा भाऊ शिराजुद्दीन याने गावकर्यांची १४२ बिघा (८८ एकर) भूमी बळकावल्याचा आरोप आहे. येथेही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. संदेशखाली येथील दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या कलम १४४ लागू करून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अजित मैती यांचा साळसूदपणा !
अजित मैती यांनी या वेळी सांगितले की, माझ्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. माझ्या पत्नीवरही आक्रमण करण्यात आले. माझ्या मुलीची परीक्षा चालू आहे. तिच्यावरही आक्रमण होण्याची भीती आहे.
संपादकीय भूमिका
|