Jaahnavi Kandula Death Issue : भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूला उत्तरदायी अमेरिकी पोलीस अधिकार्‍याला शिक्षा नाही !

भारताने नोंदवला आक्षेप

डावीकडे जान्हवी कमदुला

सिअ‍ॅटल (अमेरिका) – येथे जान्हवी कमदुला या भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूला उत्तरदायी असलेला पोलीस अधिकारी केवन डेव्ह याला शिक्षा होणार नाही. या पोलीस अधिकार्‍याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नसल्याचे अमेरिकी न्यायालयाचे म्हणणे आहे. भारताने याविषयी आक्षेप नोंदवला आहे. ‘या निर्णयाचा फेरविचार करावा’, असे भारत सरकारने म्हटले आहे.

सौजन्य : विऑन 


काय आहे प्रकरण ?

२४ जानेवारी २०२३ या दिवशी जान्हवी कमदुला पोलिसांच्या गस्ती वाहनाला धडकल्याने तिचा मृत्यू झाला होता. पोलिस अधिकारी केवन डेव्ह चारचाकी वाहन  चालवत होता. त्यामुळे जान्हवीच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई चालू झाली. पोलीस अधिकार्‍याला शिक्षा व्हावी यासाठी लोकांनी सिअ‍ॅटलमध्ये निदर्शने केली होती. केवनसोबत गाडीत डॅनियल ऑर्डरर नावाचा पोलीस अधिकारीही होता. त्याने जान्हवीच्या मृत्यूची खिल्ली उडवली होती. त्या वेळच्या पोलीस अधिकार्‍यांच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात डॅनियल ऑर्डरर म्हणतो, ‘भारतीय विद्यार्थिनीच्या जीवनाला मर्यादित मूल्य आहे. धनादेश दिल्यास (हानीभरपाई दिल्यास) काम पूर्ण होईल.’ यानंतर डॅनियल जोरजोरात हसायला लागला.

संपादकीय भूमिका 

भारताने केवळ आक्षेप नोंदवून न थांबता या अधिकार्‍यावर कठोर कारवाई होण्यासाठी अमेरिका सरकारवर दबाव आणावा !