१७ वर्षांपासून बेकायदेशीरपणे मुंबईत रहाणार्या अफगाणी नागरिकाला अटक !
मुंबई – वडाळा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारा अफगाणी नागरिक हबीबुल्लाह प्रांग उपाख्य जहीर अली खान याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली आहेत. गेल्या १७ वर्षांपासून, म्हणजे वर्ष २००७ पासून तो मुंबईत रहात असून त्याने भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे सिद्ध केली आहेत. चौकशीअंती अफगाणी नागरिक असल्याचे त्याने मान्य केले. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अफगाणी पॅनकार्ड, अफगाणी नागरिक असल्याचे ओळखपत्र, लसीकरण प्रमाणपत्र जप्त केले. आरोपीला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संपादकीय भूमिकाअसे आणखी किती घुसखोर मुंबईत रहात आहेत ? याचा पोलिसांनी शोध घ्यायला हवा ! |