अमळनेर येथे २५ फेब्रुवारीला विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर !
मंगळग्रह सेवा संस्था आणि एच्सीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांचा संयुक्त उपक्रम !
जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नाशिक येथील एच्.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१. सामाजिक कार्यात पुढे असणारी मंगळग्रह सेवा संस्था नेहमी कल्याणकारी आणि समाजाभिमुख उपक्रम राबवते. याचाच एक भाग म्हणून विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
२. शिबिरात महिलांचे आजार, तोंडाचे रोग, तसेच गर्भाशयाच्या आजारांची पडताळणी केली जाणार आहे.
३. शिबिरात ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’चाही लाभ मिळणार आहे. शिबिराच्या लाभासाठी अगोदर नावनोंदणी आवश्यक आहे. शिबिराचे आणि नावनोंदणीचे ठिकाण अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिर असून २४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिदिन सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत नावेनोंदणी करण्याचे आवाहन ‘मंगळग्रह सेवा संस्थे’ने केले आहे. या शिबिरासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या मनीषा चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.