धर्माला धारण करणारा राम म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच राम ! – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती, अकोला
अकोला – आद्यशंकराचार्य यांनी धर्माची व्याख्या करतांना म्हटले आहे की, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, तसेच समाजव्यवस्था उत्तम राखणे या तीन गोष्टी साध्य करणार्यास ‘धर्म’ म्हणतात. याचेच तंतोतंत पालन करणारा राजा म्हणजेच प्रभु श्रीराम होय. थोडक्यात धर्मही राम आणि राम म्हणजेच धर्म होय.
सांप्रतच्या काळात धर्म आणि नीती यांची चाड राहिली नाही. जनतेला स्वत: धर्मपालनाचा आदर्श घालून देणारा आणि तिला धर्मपालन करायला भाग पाडणारा धुरंधर राज्यकर्ता म्हणजेच राम होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत यांनी केले. केशवनगर भागातील ‘गुरुकुल याग समिती’द्वारा आयोजित ‘श्री गणेश याग आणि पंचकुंडी श्रीरामयाग’ या सात दिवसांच्या सोहळ्यात ‘राम आणि धर्म’ या विषयावर बोलण्यासाठी समितीला आमंत्रित करण्यात आले होते. त्यात श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक श्री. यज्ञेश जोशी आणि श्री. मोहनराव जोशी हे धर्माभिमानी समितीच्या कार्याशी जोडले आहेत. सनातन संस्थेच्या साधकांनाही यज्ञात सहभागी करून घेण्यात आले होते.
पू. श्रीहरि महाराज माकोडी यांचे समितीच्या कार्याला आशीर्वाद !
महायाग पूर्णाहुतीच्या वेळी उपस्थित प.पू. प्रल्हाद महाराज यांचे शिष्य पू. श्रीहरि महाराज माकोडी यांची भेट घेऊन समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांना समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ आणि ‘हलाल जिहाद’ हे ग्रंथ भेट देण्यात आले. यानंतर त्यांनी कार्याला आशीर्वाद दिले.