बनावट विज्ञापने करणार्या शिकवणीवर्गांवर कारवाई !
पुणे – शिकवणीवर्गाविषयी बनावट विज्ञापने केल्यास शिकवणी वर्गचालकांवर कारवाई केली जाणार आहे. विज्ञापनांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिक १६ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती पाठवू शकतात. ग्राहक संरक्षण नियमकांनी शिकवणीवर्ग, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा सिद्ध केला आहे. ही तत्त्वे खासगी शिकवणी क्षेत्रातील दिशाभूल करणार्या विज्ञापनांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सिद्ध केली आहेत.