दीड सहस्रांहून अधिक नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ !
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या पुढाकारातून २० आणि २१ फेब्रुवारीला शाहूपुरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजप महाराष्ट्र राज्य सचिव महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, गायत्री राऊत यांसह अन्य उपस्थित होते. या ठिकाणी १२ रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि ८० तज्ञ आधुनिक वैद्य उपस्थित होते. याच ठिकाणी आधारकार्ड नोंदणी, दुरुस्ती, आयुष्यमान कार्ड नोंदणी करण्यात आली. २० फेब्रुवारीला याचा लाभ जवळपास दीड सहस्रांहून अधिक लोकांनी घेतला. उपाध्यक्ष शैलेश पाटील, चिटणीस संतोष भिवटे, भाजपचे शाहूपुरी मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले होते.