देवशिल्पी विश्वकर्मा यांची विविध गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य !
‘माघ शुक्ल त्रयोदशी (२२.२.२०२४) या दिवशी ‘श्री विश्वकर्मा जयंती’ झाली. भारतातील समस्त शिल्पकार, मूर्तीकार, वास्तूतज्ञ, वास्तूविशारद आणि अन्य कलाकार यांच्यासाठी ‘देवशिल्पी विश्वकर्मा’ उपास्य दैवत आहे. त्यामुळे ते ‘श्री विश्वकर्मा जयंती’ आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतात. या लेखामध्ये आपण ‘देवशिल्पी विश्वकर्मा’ याची निर्मिती, त्याला त्रिदेवांच्या उपासनेने मिळालेले ज्ञान आणि त्याचे दैवी कार्य यांविषयी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत.
(भाग १)
१. ब्रह्मदेवाने श्री विश्वकर्मादेवाची निर्मिती करणे
‘कृतयुगाच्या (सत्ययुगाच्या आधीचे युग) आरंभी ब्रह्मदेवाने विविध जिवांची निर्मिती केली; परंतु त्यांना रहाण्यासाठी वास्तूंची निर्मिती केली नव्हती. ही आवश्यकता लक्षात घेऊन ब्रह्मदेवाने त्याची सृजनात्मक शक्ती आणि कलात्मक बुद्धी यांच्या संयोगाने विश्वकर्मा देवाची निर्मिती केली.
२. श्री विश्वकर्मादेवाने केलेली विविध देवतांची उपासना !
विश्वकर्मादेवावर भगवंताच्या मायेचा प्रभाव असल्यामुळे त्याला ‘स्वतःच्या निर्मितीचा हेतू’ आणि ‘करायचे कार्य’ यांविषयी ज्ञान नव्हते. ‘माझी निर्मिती कुठल्या विशेष उद्देशाने झाली आहे ? ’, या आंतरिक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विश्वकर्मादेव ब्रह्मलोकात गेला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला मार्गदर्शन करून त्रिदेवांची उपासना करायला सांगितली. त्याप्रमाणे विश्वकर्मादेवाने प्रथम ब्रह्मदेव, त्यानंतर विष्णु आणि शेवटी शिव या तिन्ही देवांची उपासना केली. तेव्हा त्याला तिन्ही देवांची कृपा प्राप्त झाली आणि त्याला त्याच्या आंतरिक प्रश्नांचे उत्तर मिळून त्याच्या निर्मितीमागील कार्यकारणभाव उमजला.
३. श्री विश्वकर्मादेवाने विविध युगांमध्ये केलेले दैवी कार्य !
टीप – कलियुगात धर्मकार्यात सर्वाधिक प्रमाणात योगदान देण्यामागील कार्यकारणभाव : कलियुगामध्ये स्थुलाला अधिक महत्त्व असल्याने पृथ्वी आणि आप या तत्त्वांनी युक्त असणार्या वास्तू, मूर्ती आणि शिल्प यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देवशिल्पी विश्वकर्मा कलियुगात अधिक प्रमाणात मंदिरांच्या रूपाने दैवी वास्तू आणि देवतांच्या मूर्तींच्या रूपाने सात्त्विक शिल्पकला साकारत आहे. त्यामुळे अशा सात्त्विक वास्तू आणि शिल्पे यांच्यातून प्रक्षेपित झालेल्या सात्त्विक अन् चैतन्यदायी लहरींमुळे वायूमंडलाची शुद्धी होते. अशा प्रकारे देवशिल्पी ‘विश्वकर्मा’ सात्त्विक वास्तू आणि शिल्पकला यांच्या माध्यमातून कलियुगात होणार्या धर्मकार्यात सर्वाधिक प्रमाणात योगदान देत आहे.’
४. श्री विश्वकर्मादेवाने विविध युगांमध्ये केलेली वैविध्यपूर्ण निर्मिती !
सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२३) (क्रमशः)