श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति । मां, तुम हो जगत की उद्धारिणी ।
‘१५ ते २४.१०.२०२३ या कालावधीमध्ये रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. तेव्हा ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी आपण भावभक्तीने, शरणागतीने आणि कृतज्ञतेच्या भावाने बोलले पाहिजे’, याविषयी सांगितले. ते ऐकून माझ्या मनात त्या दोघींविषयी कृतज्ञताभाव जागृत झाला आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी पुष्कळ शरणागतीने प्रार्थना होऊ लागल्या. १.११.२०२३ या दिवशी गुरुकृपेने मला त्यांच्याविषयी एक कविता सुचली. ही काव्यात्मक रचना त्यांनी माझ्याकडून गाऊनही घेतली. देवाने मला ही कविता सुचवली. त्याच्या दुसर्याच दिवशी भक्तीसत्संगामध्ये कवितेमधील सर्व देवींची स्तुती आणि माहात्म्य सांगितले गेले. ते ऐकून ‘देवाने सुचवलेली कविता, त्याची रचना आणि ती गाऊन घेतली’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
श्रीसत्शक्ति (टीप १), श्रीचित्शक्ति (टीप २)।
तुम हो आदिमाया, तुम हो आदिशक्ति ।
मां तुम हो दुष्टों की संहारिणी ।। १ ।।
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति ।
तुम हो करुणामयी, तुम हो सबकी जननी ।
मां, तुम हो प्रीति की वात्सल्य मूर्ति ।। २ ।।
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति ।
तुम हो ऐश्वर्यदायिनी, तुम हो कृपावर्षिणी ।
मां, तुम हो शरणागत की दुखहारिणी ।। ३ ।।
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति ।
तुम हो भयहारिणी, तुम ही दयामयी ।
मां, तुम हो भक्तों की वरदायिनी ।। ४ ।।
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति ।
तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।। ५ ।।
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति ।
श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति ।
मां, तुम हो जगत की उद्धारिणी’ ।। ६ ।।
(टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ)
(टीप २ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ)
– सौ. अश्विनी सावंत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), फोंडा, गोवा. (२६.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |