मंगळुरू (कर्नाटक) येथे जामीन मिळाल्यानंतर पसार झालेल्या दोघा मुसलमान आरोपींना अटक
मंगळुरू (कर्नाटक) – अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेले, जामिनावर असलेले आणि न्यायालयात सुनावणीच्या वेळी उपस्थित न रहाता पसार झालेले महंमद अब्दुल फयान आणि मोईद्दीन हाफिज यांना पोलिसांनी अटक केली आहे.
१. महंमद अब्दुल फयान चोरी, हत्येचा प्रयत्न आणि अधिकार्यांवर आक्रमण करणे यासह २३ प्रकरणांत सहभागी आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर २ वर्षांपासून तो पसार होता.
२. अमली पदार्थ विकणे आणि त्यांची ने आण करणे अशा १० प्रकरणांत सहभागी असलेला हाफिज जामिनावर सुटल्यानंतर पसार झाला होता.
संपादकीय भूमिकाकुणाला जामीन द्यावा आणि देऊ नये, हेच यातून लक्षात येते ! |