‘हिरानंदानी ग्रुप’च्या ४ जागांवर ईडीकडून धाडी !

फेमा’ नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

मुंबई – ‘फेमा’ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘हिरानंदानी ग्रुप’च्या ४ जागांवर धाडी घातल्या. ‘हिरानंदानी ग्रुप’च्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली.

सौजन्य The Economic Times 

‘परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९’ (फेमा नियम) उल्लंघन प्रकरणाच्या संदर्भात अन्वेषण यंत्रणेला माहिती मिळाली होती. त्या आधारे ईडीने २२ फेब्रुवारी या दिवशी ही कारवाई केली. निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांचे हे आस्थापन आहे. हिरानंदानी ग्रुपची स्थापना वर्ष १९७८ मध्ये झाली होती. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद येथे ‘हिरानंदानी ग्रुप’चे प्रकल्प आहेत.