नवी मुंबई महापालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर !
नवी मुंबई, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेचा वर्ष २०२४-२५ साठीचा ४ सहस्र ९५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर करून संमत केला. यात कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. या वर्षी उत्पन्नवाढीसाठी स्थानिक संस्थाकराची प्रलंबित मूल्यनिर्धारण, तसेच मालमत्ता करामध्ये प्रलंबित असणार्या वसुली करण्यात येणार आहेत. यासाठी तज्ञ संस्थेचे साहाय्य घेण्यात येणार आहे.