वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत साधिकेची सून कुंकूमार्चन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
२२.१०.२०२३ या दिवशी नवरात्रीच्या कालावधीत रात्री ९ वाजता माझी सून सौ. अर्चना कुंकुमार्चन विधी करत होती. आम्ही सर्व जण दुर्गादेवीचा नामजप करत होतो. तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले.
१. श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन होणे
‘गुलाबी रंगाची छटा असलेल्या निळ्या कमळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ उभ्या आहेत. त्यांचे मनोहारी रूप, त्यांनी नेसलेली रेशमी गुलाबी रंगाची साडी, चैतन्यमय अलंकार, त्यांचे स्मितहास्य, नेत्रांतील सागरासम प्रीती, हे पाहून माझी भावजागृती झाली.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होणे
मला मधूनच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिसत होत्या. मला त्यांचे दयेचा सागर असलेले मुख आणि पांढरेशुभ्र वस्त्र दिसत होते.
३. वातावरणातील चैतन्य ग्रहण करता येणे
मला वातावरणात पालट जाणवला. शंखनाद होत असतांना मला आनंद जाणवत होता. सगळीकडे दिव्यांची आरास होती. मला वातावरणातील चैतन्य ग्रहण करता आले.
समोर अनेक साधक बसले आहेत. मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे २ कर (हात) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे २ कर दिसत होते. एका हातात सुदर्शनचक्र, दुसर्या हातात त्रिशूळ आणि तिसर्या हातात ग्रंथ होता. चौथ्या हाताच्या तळव्यातून ‘हिंदु राष्ट्र’ असे अमृततुल्य शब्द प्रचंड गतीने बाहेर पडत होते. ते शब्द साधकांच्या शरिरात जात होते.
५. आम्हा सर्वांची शरणागती वाढून आम्ही भावविभोर झालो होतो. सर्व साधक ‘श्रीचित्शक्तिचा विजय असो । आणि श्रीसत्शक्ति विजय असो ।’ असा जयजयकार करत होते.’
मी गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मीना नकाते (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे), भारती विद्यापीठ, सोलापूर. (२४.१०.२०२३)
|