पुणे येथे बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी तरुणींसह कुटुंबियांना धर्मांधांची जिवे मारण्याची धमकी !
पुणे येथील ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण
पुणे – बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीच्या घरात घुसून तिचा भाऊ, बहीण यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. तरुणींसह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अलसबा शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (सर्रास गुन्हे करणार्या या जिहाद्यांना पोलिसांची भीती न वाटणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) आरोपी अलसबा शेख याच्या भावाविरोधात तरुणीने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. ती मागे घेण्यासाठी तरुणीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिकातरुणींनो, धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आयुष्याची हानी ओढवून घेण्यापेक्षा वेळीच सतर्क व्हा ! |