वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञांसंबंधी सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
वर्ष २०२३ मध्ये नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. त्यानिमित्त सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पूजेची भांडी घासायची सेवा मिळणे
१ अ. पूजेची भांडी घासायची सेवा मिळाल्यावर प्रथम ती सेवा स्वीकारता न येणे आणि नंतर मनात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ही भांडी वापरून पूजा करणार आहेत’, असा भाव निर्माण होणे : ‘१५.१०.२०२३ या दिवशी मला पूजेची भांडी पितांबरी पावडर लावून घासण्याची सेवा मिळाली. तेव्हा मला ती सेवा स्वीकारता येत नव्हती; कारण मला भांडी घासायला आवडत नव्हते. त्या वेळी मला वाटले, ‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला ही सेवा दिली आहे. माझ्यातील ‘आवड-नावड’ हा स्वभावदोष दूर करण्यासाठी देवीने मला ही सेवा प्रदान केली आहे.’ माझ्या मनात ‘ही भांडी वापरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूजा करणार आहेत’, असा भाव निर्माण झाला.
१ आ. पुरोहित साधकांनी ‘या भांड्यांना प.पू. गुरुदेवांच्या हाताचा स्पर्श करून ती आणायची आहेत’, असे सांगणे : तेव्हा एक पुरोहित साधक आले आणि मला म्हणाले, ‘‘ही भांडी मला द्या. मला या भांड्यांना प.पू. गुरुदेवांच्या हाताचा स्पर्श करून आणायचा आहे. आम्हाला समयमर्यादेत ही सेवा पूर्ण करायची असते.’’
१ इ. त्या वेळी माझी भावजागृती झाली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. माझ्यातील आवड-नावड हा स्वभावदोष न्यून झाला.
१ ई. साधिकेने घासलेली भांडी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पूजेसाठी वापरणे अन् ‘देवींचा स्पर्श त्या भांड्यांना होत आहे’, असे साधिकेला जाणवणे : मी जी पूजेची भांडी घासली होती, ती भांडी १६.१०.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पूजेसाठी वापरली. तेव्हा माझा भाव जागृत झाला. तेव्हा मला जाणवले, ‘देवी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या हातून पूजा करून घेत आहे अन् देवीचा स्पर्शही त्या भांड्यांना होत आहे.’
१ उ. साधिकेला पुष्कळ भांडी घासायची असतांनाही तिचा संघर्ष न होणे आणि तिला सूक्ष्मातून ‘भांडी तिच्याशी संवाद साधून तिला ‘तू किती भाग्यवान आहेस ! तुला पूजेची भांडी घासायची सेवा मिळाली आहे’, असे सांगत आहेत’, असे जाणवणे : नंतर कधीकधी मला पुष्कळ भांडी घासावी लागत असत; पण त्या वेळी माझा संघर्ष झाला नाही. मला वाटले, ‘ती भांडी माझ्याशी बोलत आहेत.’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी पूजेसाठी वापरलेली भांडी घासतांना मला जाणवले, ‘भांड्यांना त्यांच्या हातांचा स्पर्श झाल्याने मला चैतन्य मिळत आहे आणि माझ्यातील स्वभावदोष न्यून होत आहेत.’ मी एका भांड्याला म्हणाले, ‘‘तुला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्पर्श केला आहे. तू किती भाग्यवान आहेस !’’ तेव्हा ते भांडे मला म्हणाले, ‘‘तूही किती भाग्यवान आहेस ! तुला ती पूजेची भांडी घासायची सेवा मिळाली आहे. आश्रमात कितीतरी साधक आहेत; मात्र गुरुदेवांच्या कृपेने तुला ही सेवा तुझ्यातील ‘आवड-नावड’ हा स्वभावदोष दूर करण्यासाठी मिळाली आहे.’’
१ ऊ. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य जाणवले. मी गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
२. यज्ञस्थळी फुलांची रचना करण्याची सेवा मिळणे
२ अ. १५.१०.२०२३ या दिवशी यज्ञस्थळी फुलांची रचना करण्याची सेवा मिळणे
२ अ १. सेवा मिळाल्यावर ‘ही सेवा करू शकणार नाही’, असे साधिकेला वाटणे, तिने श्री भवानीदेवी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना प्रार्थना करणे अन् त्यांनी सूक्ष्मातून साधिकेला ‘तुझ्या माध्यमातून गुरुदेव ही सेवा पूर्ण करणार आहेत’, असे सांगणे : १५.१०.२०२३ या दिवशी मला यज्ञस्थळी फुलांची रचना करण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा माझा संघर्ष झाला, ‘मी ही सेवा पूर्ण करू शकणार नाही. इकडे सेवेसाठी पुष्कळ साधक असणार आहेत. माझ्याकडून काही चूक झाल्यास ते योग्य होणार नाही.’ त्या वेळी मी श्री भवानीदेवी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना प्रार्थना केली, ‘ही सेवा मला जमणार नाही. मी ही सेवा कशी करू ?’ तेव्हा त्यांनी मला सूक्ष्मातून सांगितले, ‘तुझ्यातील ‘प्रतिमा जपणे, आत्मविश्वास नसणे आणि सेवा घाईगडबडीने करणे’ हे स्वभावदोष दूर होण्यासाठी गुरुदेवांनी तुला संधी दिली आहे. तुझ्या माध्यमातून गुरुदेव ही सेवा पूर्ण करत आहेत. गुरुदेवांचा तुझ्यावर विश्वास आहे.’
२ अ २. साधिका घाईगडबडीने सेवा करत असतांना साधिकेला देवी ‘भावपूर्ण सेवा करायची आहे’, असे सूक्ष्मातून सांगत आहे’, असे जाणवणे : ही सेवा करतांना माझा संघर्ष झाला. माझ्याकडून सेवा भावपूर्ण होत नव्हती. एका पुरोहित साधकांनी मला सांगितले, ‘‘सेवा लवकर पूर्ण करा. यज्ञाची वेळ झाली आहे.’’ त्या वेळी मी घाईगडबडीने सेवा करणार होते. तेव्हा मला वाटले, ‘मला कोणीतरी पकडले आहे आणि सांगितले, ‘आपल्याला ही सेवा घाईगडबडीने नव्हे, तर भावपूर्ण करायची आहे. काळजी करू नकोस. सेवा वेळेत पूर्ण होणार आहे.’ तेव्हा मला वाटले, ‘देवीनेच मला पकडून ठेवले आहे.’ तेव्हा माझा भाव जागृत झाला. ‘साक्षात् श्री भवानीदेवीचा आश्रमात वास आहे’, अशी मला अनुभूती आली.
२ आ. १७.१०.२०२३ या दिवशी यज्ञस्थळी फुलांची रचना करण्याची सेवा मिळणे
२ आ १. देवीचे अस्तित्व जाणवणे : १७.१०.२०२३ या दिवशी यज्ञकुंडाच्या जवळ सेवा करत असतांना मला देवीचे अस्तित्व जाणवले. देवी मला सूक्ष्मातून ‘फुलांची रचना कशी करायची ?’, याविषयी सांगत होती.
२ आ २. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला फुले वहात असतांना मला सूक्ष्मातून जाणवले, ‘त्यांच्या छायाचित्रावर सुदर्शनचक्र फिरत आहे.’
२ इ. एकदा मी फुलांची रचना करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘गुरुदेव आसंदीवर बसून ‘आज फुलांची रचना कशी करायची ? उद्या अशी करायची ? फुलांची रचना करत असतांना ‘रांगोळी पुसली जाऊ नये’, याची काळजीही घ्यावी’, असे सांगत आहेत.’
२ ई. देवीने सूक्ष्मातून फुलांची रचना करायला सांगणे
२ ई १. देवीने ‘मोठी शेवंतीची फुले २ फुलांमध्ये ठेव’, असे सांगणे : एकदा मी फुलांची रचना करण्याची सेवा करत असतांना पुरोहित साधकांनी सांगितले, ‘‘कालची फुले तशीच असू देत. ती कोमेजली नाहीत.’’ तेव्हा मी सूक्ष्मातून देवीला विचारले, ‘मी काय करू ? मला वाटते, ‘काल ही फुले ध्वनीचित्रफितीत (रेकॉर्डिंगमध्ये) आली आहेत.’ त्या वेळी देवीने सूक्ष्मातून मला सांगितले, ‘मोठी शेवंतीची फुले त्या २ फुलांमध्ये ठेव, म्हणजे चांगले दिसेल.’ मी त्याप्रमाणे फुले ठेवली आणि पुन्हा देवीला विचारले. तेव्हा तिने ‘फुले पुष्कळ छान दिसत आहेत’, असे सांगितले. मी पुरोहित साधकांना याविषयी विचारल्यावर त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.
२ ई २. तेव्हा माझी भावजागृती झाली. मला वाटले, ‘आपण प्रत्येक सेवा देवाला विचारून केली, तर ती किती भावपूर्ण आणि परिपूर्ण होते ! देवी किती चांगल्या प्रकारे सुचवते आणि आमच्याकडून भावपूर्ण सेवा करून घेते.’
मी त्वरित कृतज्ञता व्यक्त केली. माझा आत्मविश्वास वाढला. माझ्यातील ‘प्रतिमा जपणे आणि घाईगडबडीने सेवा करणे’ या स्वभावदोषांवर मला मात करता आली.’
– कु. मीरा रावत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २४ वर्षे), सनातन आश्रम, वाराणसी. (१५.१०.२०२३)
|