तळोजा कारागृहातील बंदीवान ३ वर्षांपासून फरार !
बंदीवानाविरोधात गुन्हा नोंद
कल्याण – येथील कोळीवाडा भागातील आणि एका गुन्ह्यात तळोजा कारागृहात शिक्षा भोगणारा बंदीवान गणेश श्रीराम तायडे (वय ३० वर्षे) गेल्या ३ वर्र्षांपासून फरार आहे. तळोजा कारागृह प्रशासनाला त्याने दिलेल्या हमीपत्राप्रमाणे ठरलेल्या वेळेत तो कारागृहात येणे अपेक्षित होते; पण तो न आल्याने कारागृह प्रशासनाने त्याच्याविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सर्व बंदीवानांना मुक्त केले होते. त्या वेळी गणेशची सुटका करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये त्याने पुन्हा कारागृहात येणे अपेक्षित होते.
शस्त्रास्त्र कायद्याने आरोपीवर ७ वर्षांपूर्वी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी पनवेल न्यायालयात कामोठे पोलिसांकडून खटला प्रविष्ट करण्यात आला होता. न्यायालयाने विनावापर शस्त्रास्त्राचा वापर केल्याने आरोपी गणेश तायडे याला ३ वर्षे कारावासाची शिक्षा देत ६ सहस्र रुपये दंड ठोठावला होता.
संपादकीय भूमिका
|