‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. २० फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज या लेखमालेचा अंतिम भाग पाहूया.
भाग ७ वाचण्याकरिता येथे क्लिक करावे https://sanatanprabhat.org/marathi/766511.html
(भाग ८)
२०. प्रसंग – सहसाधकांनी बोलल्यानंतर भ्रमणभाषचा माईक बंद न केल्याने आणि प्रश्नाला उत्तर न दिल्याने प्रतिक्रिया येणे
२० अ. दृष्टीकोन
१. ‘अशा प्रतिक्रिया कुठे-कुठे येतात ?’, हे पाहिले पाहिजे.
२. यामध्ये ‘मला काय वाटते ?’, याकडे अधिक लक्ष असल्याचे दिसते आणि शिकण्याचा अन् परिस्थिती समजून घेण्याचा भाग अल्प आहे. ‘शिकण्याचा भाग अल्प असल्याने अहंला धक्का लागू नये’, याकडे अधिक लक्ष जाते. काही ठिकाणी प्रतिक्रियांपेक्षा सहजतेने सांगण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
३. ‘स्व’चे महत्त्व कुठेही न्यून होऊ नये’, असा विचार असल्यास पुढील व्यक्ती कसे सांगत आहे ?’, या पद्धतीकडे लक्ष जाते; कारण आपले सर्व लक्ष इतरांच्या स्वभावदोषांकडे असते. ‘शिकण्याची वृत्ती असल्यास पुढील व्यक्ती काय सांगत आहे ?’, याकडे लक्ष असते. तिथे शिकण्याचा भाग वाढतो.
४. इतरांचे स्वभावदोष पहाण्याचा भाग होत असल्यास प्रायश्चित्त घ्यावे. इतरांना समजून घेण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा भाग वाढवला पाहिजे.
२१. प्रसंग – क्षमायाचना करतांना पूर्ण प्रसंग न सांगणे
२१ अ. दृष्टीकोन
१. क्षमायाचना करतांना स्वतःच्या सवलतीनुसार सांगण्याचा भाग अधिक आहे.
२. वास्तविक पूर्ण प्रसंग न सांगण्याचे कारण काय ? याचे चिंतन झाले पाहिजे.
३. साधक पूर्ण प्रसंग लपवून ठेवतात, यात अप्रामाणिकता दिसतो. त्यासाठी पुन्हा सेवेच्या ठिकाणी आणि साधकांसमोर पूर्ण चूक सांगून क्षमायाचना करावी.
४. क्षमायाचना करतांना प्रसंग पूर्ण न सांगणे, म्हणजे स्वच्छंदी प्रवृत्ती आहे. मला जसे हवे, तसे करणे. सोपे असेल ते करणे; परंतु प्रत्यक्षात भगवंत प्रत्येक क्षणी आपल्याला पहात असतो.
५. एवढ्या लहानशा विषयात इतकी अप्रामाणिकता असल्यास पुढे मोठ्या स्वभावदोषांविषयी कसे होईल ? येथे मी क्षमायाचना केली, यापेक्षा ‘मी काय लपवून ठेवले ?’, ते जाऊन त्यांना सांगून क्षमायाचना करणे अपेक्षित होते.
२२. प्रसंग – तातडीने बाहेर जावे लागल्याने प्रक्रिया न होणे
२२ अ. दृष्टीकोन
१. या प्रसंगातून ‘प्रक्रिया न होण्यासाठी मन सवलत घेत आहे’, हे लगेच लक्षात आले पाहिजे.
२. आपण कुठेही असलो, कुठेही गेलो तरी प्रार्थना, कृतज्ञता आणि आत्मनिवेदन यांकडे सतत लक्ष दिले पाहिजे.
३. गडबड होती असे म्हणणे, म्हणजे समर्थन करणे. त्याऐवजी ‘माझ्याकडून आज झाले नाही’, असे सांगणे हा प्रामाणिकपणा आहे.
४. चुकासुद्धा तत्त्वनिष्ठतेने सांगायला शिकले पाहिजे. चूक सौम्य करून सांगणे म्हणजे ‘अहं’ जोपासणे. त्यामुळे अल्पसंतुष्टता येते.
५. ‘मी बरोबर आहे’, असे कुठेतरी मनात असते. चूक आहे तशी सांगितल्याने साधनेतील आनंद मिळू शकतो, अन्यथा ‘स्व’ला जपत आणि सवलत घेत साधना केल्यास साधनेचा वेग मंदावतो. पुढे पुढे मन बहिर्मुख होऊन इतरांच्या चुकांकडेच बघायला लागते.’
– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू (समाप्त)