श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीयंत्राची (देवीची) मानसपूजा करतांना ईश्वरेच्छा अनुभवता येणे
‘मी प्रतिदिन स्नान केल्यानंतर गळ्यातील श्रीयंत्र हातात घेऊन अष्टोत्तर शतनामावली (श्री ललिता त्रिपुरासुंदरी देवीची १०८ नावे) म्हणत श्रीयंत्राची मानसपूजा करते. एकदा श्रीयंत्राची मानसपूजा करतांना मला सूक्ष्मातून पारिजातकाचे फूल दिसले. त्यानंतर लगेचच शतनामावलीत पारिजातकाच्या फुलाचा उल्लेख आला. आश्चर्य म्हणजे ‘नामावली म्हणतांना श्रीयंत्राला कोणती फुले अर्पण करायची ?’, हे मी काहीच ठरवले नव्हते. मी मानसरित्या फूल हातात घेतल्यावर ‘ते पारिजातकाचे फूल आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘ही ईश्वरेच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले.’ – (श्रीचित्शक्ति) सौ. अंजली मुकुल गाडगीळ (१३.१०.२०२३)
|