अमेरिकेतील अलाबामा राज्यात नायट्रोजनचा वापर करून मृत्यूदंड देणार !
बर्मिंगहॅम (अलाबामा) – अमेरिकेतील अलाबामा राज्यात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला नायट्रोजन वायूचा वापर करून मृत्यूदंड देण्याची सिद्धता चालू आहे. राज्यात फाशीची शिक्षा देण्यासाठी नायट्रोजन वायूचा वापर केल्याची घटना महिनाभरापूर्वीच उघडकीस आली होती. अशा प्रकारे फाशीची शिक्षा देण्यावर बरीच टीका झाली होती.
एलन यूजीन मिलर ३ जणांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी !
५९ वर्षांच्या एलन यूजीन मिलर याला वर्ष १९९९ मध्ये बर्मिंगहॅममध्ये ३ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अॅटर्नी जनरलच्या कार्यालयाने सांगितले की, मिलर याला ‘नायट्रोजन हायपोक्सिया’ने फाशी दिली जाईल. या पद्धतीमध्ये गुन्हेगाराला श्वसन यंत्र बसवले जाते. या यंत्रात नायट्रोजन वायू असल्यामुळे गुन्हेगाराने श्वास घेतल्यामुळे तो या विषारी वायूमुळे बेशुद्ध पडतो आणि नंतर मृत्यूमुखी पडतो. २५ जानेवारी २०२४ या दिवशी प्रथमच केनेथ स्मिथ याला नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड देण्यात आला होता.