गुजरातमध्ये आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आली १०८ बेकायदेशीर थडगी !
कर्णावती (गुजरात) – राज्यात अतिक्रमणे हटवण्याची मोहीम वेगाने चालू आहे. ही मोहीम बेट द्वारका येथून चालू झाली आणि आता ती सुरत, जामनगर, पोरबंदर, पावागड आणि कर्णावती येथपर्यंत पोचली आहे. सोमनाथ मंदिराजवळील अवैध अतिक्रमणही हटवण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०८ बेकायदेशीर थडगी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. ‘जुनागडच्या किल्ल्याजवळ मोठ्या प्रमाणात थडगी कुठून आली ?’, हे कुणालाच ठाऊक नाही. इतक्या लवकर येथे थडगे कसे बांधता येईल ? षड्यंत्र रचून बांधलेली प्रत्येक बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी आमचा बुलडोझर सिद्ध आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी गुजरात विधानसभेत दिली.
राज्यात रात्रभर गरबा खेळण्यास अनुमती देणार !
राज्यात नवरात्रीमध्ये रात्रभर गरबा खेळण्याला अनुमती देण्याविषयी हर्ष संघवी यांनी सभागृहात सांगितले की, जर लोक माझ्या राज्यात गरबा खेळणार नाहीत, तर ते पाकिस्तानात जाऊन खेळतील का?
संपादकीय भूमिका
|