कराड येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजींचे जाहीर व्याख्यान !
कराड, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कराड आणि पाटण विभागाच्या वतीने ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलीदानाचा हिंदु समाजाशी असलेला संबंध’ या विषयावर पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान येथील लल्लुभाई मैदान, यशवंत हायस्कूल पाठीमागे या ठिकाणी २४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून सर्व हिंदुप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कराड आणि पाटण तालुक्याचे कार्यवाहक श्री. सागर आमले यांनी केले आहे.