स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी आहे ! – सागर बेग, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय श्रीराम संघ

श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित धर्मसभा !

सभेला उपस्थित जनसमुदाय

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर), २१ फेब्रुवारी (वार्ता.) – लाखो हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मदर तेरेसांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो; पण ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासह धर्मांतराला विरोध करत धर्माचेही कार्य अंदमानच्या कारागृहात राहून केले त्या स्वातंत्रवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ दिले जावे, अशी मागणी आज हिंदूंना करावी लागत आहे, हेच पुष्कळ मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय श्रीराम संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी मांडले. श्रीरामपूर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या धर्मसभेत सहस्रोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदूंसमोर सागर बेग बोलत होते. हिंदु मंदिरांना लक्ष्य करणारा वक्फ बोर्ड रहित करून त्यांच्या कह्यातील १७ लाख एकर भूमी मुक्त करून घ्यावी, लव्ह जिहादविरोधी कायदा व्हावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

मार्गदर्शन करतांना श्री. सागर बेग

सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, बाभळेश्वर येथील शिवचरित्रकार नवनाथ महाराज म्हस्के, हिंदु धर्म प्रसारक ह.भ.प. राहुल महाराज पोकळे, मंगल भक्त सेवा मंडळ, अहिल्यानगरचे संस्थापक श्री विश्वेश्वर स्वामी (राजाभाऊ) कोठारी, पुणे येथील ‘स्वारद फाऊंडेशन’च्या संस्थापिका श्रीमती स्वाती मोहोळकर यांचेही याप्रसंगी मार्गदर्शन झाले. सभेच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली.