आजच्या ‘जम्मू-काश्मीर संकल्प दिना’पूर्वी ब्रिटिश संसदेत विशेष चर्चा

ब्रिटिश संसद

लंडन (जम्मू-काश्मीर) – ‘जम्मू-काश्मीर स्टडी सेंटर यूके’द्वारे जम्मू-काश्मीर संकल्प दिनापूर्वी लंडनमधील संसदेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती. ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन, वीरेंद्र मिश्रा, थेरेसा व्हिलियर्स आणि इलियट कोलबोर्न यांनीही चर्चेत भाग घेतला. जम्मू-काश्मीर संकल्प दिन उद्या, २२ फेब्रुवारी या दिवशी आहे. २२ फेब्रुवारी १९९४ या दिवशी संसदेत संपूर्ण काश्मीर भारताचा आहे, असा संकल्प प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्या दिवसापासून २२ फेब्रुवारी ‘जम्मू-काश्मीर संकल्प दिन’ साजरा केला जातो. (नुसता संकल्प दिन साजरा करून काय उपयोग ? हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक)