भोपाळ (मध्यप्रदेश) येथील रघुनंदन सिंह राजपूत यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
फोंडा (गोवा) – भोपाळ येथील बांधकाम व्यावसायिक श्री. रघुनंदन सिंह राजपूत यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. सनातनचे साधक सर्वश्री अभिषेक पै आणि गिरीजय प्रभुदेसाई यांनी त्यांना आश्रमात चालणारे अध्यात्म, राष्ट्र-धर्म आणि संशोधन कार्य यांविषयी माहिती दिली.
श्री. रघुनंदन सिंह राजपूत यांनी दिलेला अभिप्राय !
‘आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे साधक अत्यंत शिस्तबद्धतेने आणि निःस्वार्थ भावाने स्वयंपाकघर, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, ग्रंथ, तांत्रिक सेवा, हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार अशा अनेक सेवा करतात. आश्रमातील वातावरण पाहून आम्ही भारावून गेलो. सनातन आश्रमातील गुरुजन आणि साधक यांना कोटी कोटी नमन !’