Pandit Pradeep Mishra Received Threat : कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी !
नवनीत राणा यांची गृहमंत्र्यांकडे मिश्रा यांना सुरक्षा पुरवण्याची केली मागणी !
सिहोर (मध्यप्रदेश) – येथील प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत रवि राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून पंडित मिश्रा यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्याला नुकतेच शहा यांनी उत्तर दिले. ही माहितीही नुकतीच समोर आली.
डिसेंबर २०२३ मध्ये पंडित मिश्रा अमरावती येथे कथावाचन करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना धमकीचे पत्र मिळाले होते. अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी अमित शहा यांना पत्र लिहून संरक्षण देण्याची तेव्हाच मागणी केली होती. १० फेब्रुवारी या दिवशी शहा यांनी पत्राला उत्तर दिले. सिहोरचे पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी या प्रकरणी म्हणाले की, हे प्रकरण महाराष्ट्रातील आहे, मात्र पंडितजींना मध्यप्रदेश पोलीस मुख्यालयाकडून आधीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.