Congress Krishna Poster : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे काँग्रेसने लावलेल्या फलकाद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन
राहुल गांधी यांना भगवान श्रीकृष्ण, तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना अर्जुनच्या रूपात दाखवले !
कानपूर (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी २१ फेब्रुवारी या दिवशी त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या पार्श्वभूमीवर कानपूरला पोचले होते. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात मोठे फलक आणि भित्तीपत्रके लावण्यात आली होती. राहुल गांधी यांची सभा घंटाघर चौकात होणार होती. त्यासाठी लावण्यात आलेल्या मोठ्या फलकावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भगवान श्रीकृष्ण, तर उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना अर्जुन यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. राहुल गांधी महाभारतातील श्रीकृष्णासारखे रथाचे सारथी झाले आहेत, तर अजय राय अर्जुनाच्या रूपात धनुष्यबाण घेऊन मागे बसले आहेत. काँग्रेसचे स्थानिक नेते संदीप शुक्ला यांनी हा फलक लावला आहे. संदीप शुक्ला म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्ध जिंकायला लावले, त्याचप्रमाणे राहुल गांधीही भाजपविरुद्ध निवडणूक जिंकतील. उत्तरप्रदेशमध्ये ते अजय राय यांचे सारथी बनले आहेत.’’ (हिंदुद्वेषी काँग्रेसला निवडणुका जवळ आल्या की, रामायण किंवा महाभारत आठवते, हे लक्षात घ्या ! – संपादक)
#WATCH | Kanpur, UP: Congress workers put up posters showing Congress leader Rahul Gandhi as ‘Lord Krishna’ and UP Congress Chief Ajay Rai as ‘Arjun’ before the Bharat Jodo Nyay Yatra reaches Kanpur today pic.twitter.com/fzQt6fmcrk
— ANI (@ANI) February 21, 2024
ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक) |
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने तिच्या स्थापनेपासून हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि परंपरा यांची विविध माध्यमांतून हेटाळणी केली. या पक्षाचे राजकीय अस्तित्व आता हिंदू संपवतील ! |