देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट
देहली – येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. या प्रदर्शनाला ‘जुनापीठाधिश्वर आखाड्या’चे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसचिव डॉ. मनमोहन वैद्य आणि ‘पवनचिंतन धारा आश्रमा’चे पुजारी श्री. पवन सिन्हा गुरुजी यांनी भेट देऊन अवलोकन केले.
सनातन धर्मातील धर्मग्रंथांचे दैवी ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये संस्थेच्या वतीने अध्यात्म, सात्त्विक धर्माचरण, दैनंदिन आचरणाशी संबंधित कार्ये, भारतीय संस्कृती इत्यादी अनेक विषयांवरील मौल्यवान ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आले, तसेच सनातनची विविध सात्त्विक उत्पादनेही प्रदर्शनात ठेवण्यात आली.