पुणे येथील येरवडा भागामध्ये टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुंडांची ‘परेड’ घेऊन सर्वांनी तंबी दिली होती. ‘सामाजिक माध्यमांमध्ये ‘रिल्स’ सिद्ध करून स्वत:चे प्रस्थ माजवणार्‍यांवर लक्ष ठेवले जाणार आहे’, असेही सांगितले. तरी प्रत्यक्षामध्ये शहरातील गुन्ह्याची संख्या न्यून होत नाही. येरवडा भागातील पांडू लमाण वसाहतीमध्ये एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी सोहम् चव्हाण आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गुन्हेगारांना कडक शिक्षा करून गावगुंडांची दहशत मोडून काढायला हवी, असे सामान्य नागरिकांना वाटते. – संपादक)

संपादकीय भूमिका :

पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !