हवालातील पैशांपैकी ४५ लाख रुपये लुटणारे पोलीस कर्मचारी निलंबित !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – नाशिक येथून मुंबईला हवालाची ५ कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली मोटार अडवून ४५ लाख रुपयांची रोकड लुटणार्‍या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस खात्यातून निलंबित केले आहे. बाळासाहेब शिंदे, गणेश कांबळे, मारुति पिलाने अशी त्यांची नावे असून हवाला व्यवहार करणारा मध्यस्थ बाबूभाई सोलंकी यालाही कह्यात घेतले आहे. या संदर्भात एका व्यापार्‍याने भिवंडीजवळील नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. तक्रारदाराचा पोलाद विक्रीचा व्यवसाय असून ते सोलंकी यांचे नातेवाईक आहेत. सोलंकी यांची चौकशी केली असता त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील अन्य तीन कर्मचार्‍यांशी संगनमत करून रोकड लुटण्याचा डाव रचल्याचे सांगितले. या कृत्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने आरोपींना पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी दिले आहेत.

संपादकीय भूमिका :

  • भ्रष्टाचार, लुटालूट आणि खाबुगिरीने बरबटलेली पोलीस यंत्रणा कधी सुधारणार ?
  • अशा पोलिसांवर केवळ निलंबनाच्या ऐवजी बडतर्फीची कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !