मराठीला ‘अभिजात’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी !

केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यावा, असे प्रत्येक भाषाप्रेमींना वाटते !

पिंपरी (जिल्हा पुणे) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयीचे वृत्त केंद्र सरकारच्या भारतीय साहित्य अकादमीकडून संस्कृती विभागाकडे सादर होऊनही संस्कृती विभागाकडून या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई होत आहे, तरी या प्रस्तावास संस्कृती विभागाने तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संस्कृती मंत्रालयाकडे केली आहे.

निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे की, मराठी भाषेच्या संदर्भात अकादमीने भाषिक तज्ञांच्या समितीच्या २ बैठका यापूर्वीच घेतल्या असून या बैठकांचे इतिवृत्त भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले; मात्र या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नाही. तरी दिरंगाई करणार्‍या संस्कृती विभागातील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.