‘निर्विचार’ हा जप करतांना सहस्रारावर संवेदना जाणवून ध्यान लागणे

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेनुसार मी ‘निर्विचार’ हा नामजप करायला आरंभ केल्यावर मला माझ्या सहस्रारावर सतत संवेदना जाणवून अधूनमधून माझे ध्यान लागते आणि जप विसरला जाऊन केवळ सहस्रारामध्ये चालू असलेल्या स्पंदनांकडे लक्ष जाते. त्या वेळी मला एकदम शांत वाटून ‘या स्थितीमधून बाहेर पडूच नये आणि काही न करता केवळ ती स्थिती अनुभवत रहावे’, असे मला वाटते. ही अनुभूती दिल्याबद्दल परम पूज्य डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक