साष्टांग नमन या त्रिगुणमयी ‘श्रीचित्शक्ति’ मातेला ।
‘मी ध्यानमंदिरात नामजपाला बसलो होतो. अकस्मात् ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला होणार्या आध्यात्मिक त्रासासाठी प्रारंभी कसे साहाय्य केले’, याची आठवण आली. ते आठवल्यावर माझे मन भरून येऊन मनात कृतज्ञताभाव निर्माण झाला. तेव्हा सुचलेल्या काव्यपंक्ती येथे दिल्या आहेत.
मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्तगुरु अवनीवर अवतरले ।
कलियुगी ‘श्रीचित्शक्ति’(टीप १) रूपाने पुन्हा भूवर प्रकटले ।। १ ।।
हे चैतन्यरूप त्रिभुवनी संचारित झाले ।
धर्मपताका फडकावण्या श्रीविष्णूने (टीप २) कार्यरत ते केले ।। २ ।।
हिंदु राष्ट्र स्थापण्याचा वसा त्यांनी घेतला ।
स्थूल-सूक्ष्म कार्यासाठी जीवन लावले पणाला ।। ३ ।।
आपल्या मधुरवाणीने सर्वांना आपुलेसे करती ।
प्रचंड सूक्ष्मज्ञानाने त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट जाणती ।। ४ ।।
धर्मकार्यासाठी मायापाशाचे बंध तोडले ।
गुरुदेवांचा वसा पुढे चालवण्या जीवन अर्पिले ।। ५ ।।
धन्य ती ‘श्रीचित्शक्ति माता’, घडवले श्रीविष्णूने धर्मकार्यासाठी ।
भक्ती, ज्ञान अन् वैराग्य यांची आहे ती त्रिमूर्ती ।। ६ ।।
साष्टांग नमन या त्रिगुणमयी ‘श्रीचित्शक्ति’ मातेला ।
प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा आम्हा साधकजनांना’ ।। ७ ।।
टीप १ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, गोवा. (१३.११.२०२३)
|