जिना तोडल्याची पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांची फरपट !
रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार !
डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ अ वरील एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ आठवड्यापूर्वी तोडला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते. यामध्ये प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. यामध्ये प्रवाशांचा अनावश्यक वेळ जातो, तसेच त्यांची दमणूकही होते.