राज्यभर शिवजयंती उत्साहात साजरी !
मुंबई – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतभर साजरी केली जाते. १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांची दिनांकानुसार जयंती होती. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जळगाव येथे आतषबाजी करण्यात आली. वर्धा येथे पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या मंदिरात उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सातार्यात अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि ‘लेझर शो’चे आयोजन करण्यात आले. अजिंक्यतारा गड सहस्रो मशालींनी उजळून निघाला, तर सातारा शहर ‘लेजर’ शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. गडावरील राजसदरेवर व्याख्याते सुनील लाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. इंदापूर येथेही शिवजयंती उत्साहात साजरी झाली.