श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिल्यावर सौ. रोहिणी भुकन यांना जाणवलेली सूत्रे
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करणे, हा एक दैवी सत्संगच असल्याचे जाणवणे
‘वर्ष २०२२ मध्ये भाद्रपद अमावास्येला (२५.९.२०२२ या दिवशी) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्यांचे औक्षण केले. हा एक दैवी सत्संगच होता. देवाने आम्हाला हा सत्संग दिला, त्याबद्दल कृतज्ञतेसाठी शब्दच नाहीत. सत्संगात मला वेगळीच शांतता अनुभवता आली.
२. ‘देवाने काहीच न्यून केले नाही, तरी गुरूंचे ज्ञान आत्मसात् करण्यास न्यून पडते’, याची वाढदिवसाच्या वेळी जाणीव होऊन खंत वाटणे
वाढदिवसाच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती आणि मला माझ्या चुका आठवून ‘देवाने मला काहीच न्यून केले नाही. माझा जन्म गुरुसेवेसाठी झाला आहे, तरीही तीन गुरूंकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) त्यांचे ज्ञान आत्मसात करण्यास मी उणी का पडते ?’, अशी मला पुष्कळ खंत वाटली.
३. ‘स्व’ला विसरून आता प्रत्येक क्षण गुरु आणि गुरुसेवा यांसाठीच द्यायचा असल्याचे लक्षात येऊन, तसे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन लाभणे
गुरुमाऊलीने त्यांच्या सुकोमल चरणांवरती आम्हाला ठेवले आहे. आता मला याचा पूर्णपणे लाभ करून घ्यायचाच आहे. वाढदिवसाच्या वेळी ‘स्व’ला विसरून आता प्रत्येक क्षण हा गुरूंसाठी आणि गुरुसेवेसाठीच द्यायचा आहे’, हे माझ्या लक्षात येऊन, तसे प्रयत्न करण्यास मला प्रोत्साहन मिळाले.
मला हा सत्संग मिळाला, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (वर्ष २०२३ मध्ये आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |