रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी अकोला येथील सौ. स्मिता भुरे यांना आलेली अनुभूती
१. शिबिराला जाण्यापूर्वी विविध शारीरिक त्रास होऊनही शिबिराला उपस्थित रहाता येणे आणि शिबिराच्या वेळी आश्रमातील चैतन्याने कोणताही त्रास न होता बरे वाटणे
‘२७.१०.२०२३ ते २९.१०.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर होते. शिबिराला जाण्यापूर्वी दोन मास मला बरे वाटत नव्हते. मला चक्कर येणे, मळमळणे, कानांत सतत आवाज येणे हे त्रास होत होते; पण गुरुमाऊलीच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने या त्रासांवर मात करून २८ घंट्यांचा प्रवास करून आणि औषधे घेऊन मी शिबिरासाठी पोचले.
या भूवैकुंठात (रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात) ३ दिवसांच्या शिबिरात गुरुमाऊलीच्या कृपेने मला काहीच त्रास झाला नाही. येथील आश्रमाच्या चैतन्याने मला बरे वाटू लागले.
२. मी ध्यानमंदिरात नामजप करत असतांना मला हलकेपणा जाणवत होता.
‘हे गुरुदेवा, शिबिराला उपस्थित राहून मला चैतन्या ग्रहण करण्याची संधी आणि हलकेपणा दिल्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. स्मिता भुरे, अकोला (४.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |