आई-वडील, सासू-सासरे समवेत असतील, तर महिलांना निराशा येण्याचे प्रमाण अल्प ! – हेलसिंकी विद्यापिठ, फिनलँड
फिनलँडमधील हेलसिंकी विद्यापिठाच्या संशोधनातील निष्कर्ष !
हेलसिंकी (फिनलँड) – आई-वडील, आजी-आजोबा किंवा सासू-सासरे समवेत असल्यास आई झालेल्या महिलांच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असे फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापिठाने केलेल्या एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे. या अभ्यासानुसार निरोगी सासू-सासरे किंवा आई-वडिल यांच्यासोबत रहाणार्या मातांमध्ये नैराश्यविरोधी औषध (अँटी डिप्रेशन) घेण्याची जोखीम अल्प होते.
Findings from Research at the @helsinkiuni #Finland
Women experience less #depression when living with parents and in-laws.
Family cohesion is important for mothers' mental health.#FamilyValues #SocialSupport pic.twitter.com/mDFbzprAhQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 20, 2024
फिनलंडच्या हेलसिंकी विद्यापिठातील लोकसंख्येविषयी संशोधन करणार्या डॉ. नीना मेत्सा सिमोला म्हणाल्या, ‘‘आई-वडील ७० वर्षांपेक्षा अल्प वयाचे असतील आणि त्यांना आरोग्यविषयी गंभीर समस्या नसतील, तर मुलांना जन्म देणार्या महिलांमध्ये नैराश्यविरोधी औषध खरेदीची शक्यता अल्प असते.’
अधिक माहितीसाठी : DOI: 10.1080/00324728.2023.2287493 ← क्लिक करा
कौटुंबिक सुसंवाद मातांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे !
संशोधकांनी वर्ष २००० ते २०१४ या कालावधीत फिनलंडमध्ये मुले असणार्या ४ लाख ८८ सहस्र मातांवर लक्ष ठेवण्यात आले. संशोधन पथकाने पाहिले की, मातेचा कुणी साथीदार होता कि नाही. यासोबत आजी-आजोबा, आई आणि वडील या दोघांचे वय, आरोग्य यांचेची निरीक्षण करण्यात आले . डॉ. मेत्सा सिमोला म्हणाल्या की, मुले असणार्या कुटुंबासाठी आजी-आजोबांचे सहकार्य महत्त्वाचे आहे आणि लोकांना नैराश्यापासून वाचवण्यासाठी दुसर्यांचे साहाय्य आवश्यक आहे. कुटुंबात असलेल्या आजी-आजोबांचा आधार मातांना नैराश्यापासून वाचवू शकतो.