FIR Against BJP MLAs : श्रीरामाचा अवमान करणार्या शिक्षिकेच्या विरोधात आंदोलन करणार्या भाजपच्या आमदारांवरच गुन्हा नोंद !
मंगळुरू (कर्नाटक) येथील घटना !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील सेंट गेरोसा इंग्रजी प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने श्रीरामाचा अवमान केल्यावरून शाळेबाहेर हिंदु संघटना, तसेच भाजप यांच्याकडून आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे आमदार डी. वेदव्यास कामत आणि भारत शेट्टी, तसेच विश्व हिंदु परिषदेचे येथील प्रमुख शरण पंपवेल, अन्य हिंदु कार्यकर्ते यांच्या विरोधात द्वेष पसरवणे, बेकायदेशीर सभा घेणे, धार्मिक भावना दुखावणे, धमकी देणे आदी आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
Mangaluru: St Gerosa School incident – Case filed against five including MLAs https://t.co/YJQWb7URes
— Daijiworld.com (@daijiworldnews) February 15, 2024
श्रीरामाचा अवमान करणार्यांवर गुन्हा नोंद होत नाही ! – आमदार भारत शेट्टी
या संदर्भात आमदार भारत शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, माझ्यावर वाईट उद्देशाने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आधी हरीश पंजा यांच्यावर नंतर वेदव्यास कामत यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. ‘जय श्रीराम’ म्हणणार्यावर गुन्हा नोंदवला जात आहे; मात्र रामाचा अवमान करणार्यांवर गुन्हा नोंद केला जात नाही. आम्ही आमदार आहोत. जामीन घेणार नाही. या प्रकरणाला सामोरे जाऊ.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर दडपशाही ! |