पिंपरी-चिंचवडमधील (पुणे) कुदळवाडी परिसरातील भंगाराच्या गोदामात स्फोट : ८ जण घायाळ !

गोदामात आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याची माहिती उघड !

रसायनाने भरलेल्या ‘बॅरल’ची स्वच्छता करतांना झालेला स्फोट

पुणे – पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी परिसरातील एका भंगाराच्या गोदामात १७ फेब्रुवारीला रात्री स्फोट झाला. या स्फोटात ८ कर्मचारी घायाळ झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. घायाळांमधील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रसायनाने भरलेल्या ‘बॅरल’ची स्वच्छता करतांना हा स्फोट होऊन मोठी आग लागली. ही भीषण आग २ घंटे चालू होती. गोदामात आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्यामुळे ही आग लागल्याचेही सांगण्यात येते. (प्रशासन याविषयी काय करणार आहे ? – संपादक)

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्नीशमन केंद्र आणि चिखली उपकेंद्राचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी घायाळांना रुग्णालयात नेले.