‘नवनीत’च्या प्रश्नसंचाच्या छायांकित प्रती विकणार्या तिघांना अटक !
१ लाख ४५ सहस्र ३०० रुपयांचा माल जप्त
गोंदिया – शैक्षणिक अभ्यासक्रमातील शिक्षण साहित्य पुरवणार्या ‘नवनीत’ आस्थापनाच्या प्रश्नसंचाच्या लहान आकारातील छायांकित प्रती काढून त्यांची विक्री करणार्या ‘झेरॉक्स’च्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ‘कॉपीराईट अधिनियम उल्लंघन’ प्रकरणी पोलिसांनी यात १ लाख ४५ सहस्र ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. गुन्हा नोंदवून तिघांना कह्यात घेतले आहे. रविकांत हरिप्रसाद जायस्वाल, उज्ज्वल तुषारकांत जायस्वाल आणि चंद्र रमेश जोशी अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |