अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या तिघांना अटक !
नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार !
नवी मुंबई – बांगलादेशातून १४ वर्षांच्या मुलीला फूस लावून भारतात पळवून आणणार्या आणि तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या तिघांना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी संबंधित घरावर धाड घातली. या वेळी मोहीनूर इस्माइल मंडल (वय ३७ वर्षे), त्याची पत्नी मोहिनी उपाख्य डॉली मोहीनूर मंडल (वय २७ वर्षे), दलाल समोन धातून शेख (वय २७ वर्षे) अशी त्या तिघांची नावे आहेत. (अशांना आजन्म कारागृहात डांबायला हवे ! – संपादक)
दलाल समोन धातून शेख याने अल्पवयीन मुलीसमवेत आधी प्रेमसंबंध निर्माण केले आणि लग्नाचे आमीष दाखवून तिला घुसखोरीच्या मार्गाने भारतात आणले. त्यानंतर तिला वरील दांपत्याच्या कह्यात दिले.