मुंबई महापालिकेची रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू !
मुंबई – शहर आणि उपनगरे येथे मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वांना होतो. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज या रोगाचे संक्रमण वाढते. मुंबई महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’च्या अंतर्गत भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ७० टक्के कुत्र्यांचे लसीकरण मार्च मासापर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय घेण्यात आले आहे. आतापर्यंत २५ सहस्र कुत्र्यांना लस देण्यात आली आहे.
रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका अल्प करणे, प्राण्यांचे कल्याण साधणे, रेबीजचा प्रसार न्यून करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, हे यामागील उद्देश आहेत.
संपादकीय भूमिकाभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हाच यामागील मूळ उपाय आहे ! |