२ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत ‘कोकण महोत्सव’ पार पडला !

मुलुंड येथे भाजप, मुलुंड सेवा संघ आणि महिला बचत गट यांचा पुढाकार !

खासदार मनोज कोटक यांना श्रीरामाची प्रतिमा भेट देतांना सनातन संस्थेच्या सौ. आशा गंगाधरे

मुलुंड – भाजप, मुलुंड सेवा संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई कोकण आघाडी अध्यक्ष श्री. सुहास आडीवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोकणातील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि रोजगार यांना चालना मिळण्यासाठी हे महोत्सव प्रतिवर्षी आयोजित केले जाते. ११ फेब्रुवारीला महोत्सवाची सांगता करण्यात आली.

महोत्सवात भाजपचे खासदार मनोज कोटक, आमदार अधिवक्ता आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, मुंबईचे भाजप महामंत्री संजय उपाध्याय, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार रमेशदादा पाटील, ‘मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रकाश दरेकर आणि भाजप ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, माजी नगरसेवक नंदकुमार वैती यांनी भेट दिली. मुलुंड आणि परिसरातील जनतेने महोत्सवाला भेट दिली, असे आयोजक माजी नगरसेवक, मुलुंड सेवा संघांचे अध्यक्ष श्री. प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले.

सनातन संस्थेचे लक्षवेधी ग्रंथप्रदर्शन !

कोकण महोत्सवात सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. यामध्ये साधना, व्यक्तीमत्त्व विकास, कर्मयोग, बालसंस्कार, राष्ट्र-धर्म रक्षण, आयुर्वेद या विषयांवरील ग्रंथ मांडण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला खासदार मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, तसेच रमेशदादा पाटील यांनीही भेट दिली. हे ग्रंथप्रदर्शन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.