यवतमाळ येथे ६ गोवंशियांची तस्करी पोलिसांनी रोखली !
२ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
यवतमाळ, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील नेर-कारंजा मार्गावरील नाकाबंदीच्या वेळी चारचाकीतून ६ गोवंशियांची तस्करी होत असल्याचे नेर पोलिसांना लक्षात आले. त्यानंतर गाडीतील २ धर्मांधांवर गुन्हा नोंद करण्यात आला, तसेच ६ गोवंशियांसमवेत वाहन जप्त करण्यात आले. (कायदा असूनही तस्करी होते, यावरून पोलिसांचा तसूभरही धाक उरला नाही, हे लक्षात येते – संपादक)
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असूनही त्याची कार्यवाही होत नसल्याने गोवंशियांच्या तस्करीच्या घटना वारंवार घडत आहेत ! |