सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांकडून सोने तस्करीची १४ प्रकरणे उघड !
|
मुंबई – गेल्या २ दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सोने तस्करीची १४ प्रकरणे उघड केली. यात ३ कोटी ९२ लाख रुपयांचे ७ किलो २० ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले आहे. यात ५ आयफोन – १५ कह्यात घेण्यात आले आहेत. एका प्रकरणात तस्करांनी विमानाच्या आसनात सोने लपवले होते.
या सर्व प्रकरणांत अटक केलेले काही नागरिक भारतीय, तर काही विदेशी आहेत. (सोन्याची तस्करी करण्याचे ठिकाण म्हणून मुंबई विमानतळ सध्या ओळखले जाते ! विमानतळाला लागलेले हे गालबोट मिटवण्यासाठी तस्करी प्रकरणातील संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)