‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’सारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही ‘काफरशाही’ अटकेचे पाणी पिऊन तृप्त अन् पुष्ट झाली. या काफरशाहीचे मूळ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘काफर’सारखे अपशब्द वापरून मुसलमानांची हेटाळणी आणि छळ कधी केला नाही; कारण ते सहिष्णू होते. त्यांची परंपरा उदार अन् सहिष्णू होती; परंतु येथे हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, आत्मघात आणि मूर्खता यांच्या परमसीमा गाठणारी त्यांची सहिष्णुता नव्हती.
– भाषाप्रभु पु.भा. भावे