श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
१. ‘सत्संगाच्या ठिकाणी स्वतःमध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व पूर्णरूपाने कार्यरत आहे’, असे जाणवणे आणि पुष्कळ भावजागृती होणे
‘मे मासात एका सत्संगाच्या आरंभी मी प्रार्थना करत असतांना ‘माझ्या ठिकाणी साक्षात् लक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचेच अस्तित्व पूर्णरूपाने कार्यरत आहे’, असे मला जाणवले. ‘त्यांनी मला पवित्र केले’, असे मला वाटले. ‘मला माझ्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ याच प्रार्थना करत आहेत’, असे जाणवल्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली. जेव्हा मी प्रार्थना करण्यासाठी हात जोडत होते, तेव्हा मला हीच अनुभूती अधूनमधून येत होती. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रतीचा भाव वाढून त्यांचे स्मरण होणे
ब्रह्मोत्सवानंतर गुरुदेवांच्या कृपेने श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रती माझा भाव वाढला असून आता मला त्यांचे स्मरण होऊ लागले आहे. आता जेव्हा मी कुंकू लावते, तेव्हा माझा ‘श्रीसत्शक्तिदेव्यै नमः । ’, श्रीचित्शक्तिदेव्यै नमः ।’, असा नामजप आपोआप होऊ लागतो. त्यातून मला पुष्कळ आनंद अनुभवता येतो.
‘हे सर्व मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याच कृपेमुळे अनुभवता येत आहे. त्यासाठी मी तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (१८.८.२०२३)
|